
लंडन येथील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे सिरीजचा तिसरा आणि शेवटचा सामना रविवार, 19 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या मॅचसाठी भारतीय टीम लंडनमध्ये दाखल झाली. भारतीय क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या आगमनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान, या प्रवासादरम्यान टीम इंडियाचा एक स्टार फलंदाज अचानक गायब झाला अन् हॉटेलमध्ये चेक इनच नाही केलं. त्यामुळे आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
खाजगी कारमध्ये बसून निघून गेला
टीम इंडियाच्या या प्लेयरने संघाच्या खेळाडूंसोबतच फ्लाईटने लंडनला आला आणि टीमच्या बसमधूनही त्याने प्रवास केला. परंतु, भारतीय संघ हॉटेलवर पोहोचताच सर्वांपेक्षा वेगळी भूमिका घेतली. तो बसमधून उतरून हॉटेलमध्ये जाण्याऐवजी आपलं सामान घेऊन तिथं आधीच वाट पाहत असलेल्या एका खाजगी कारमध्ये बसून निघून गेला. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून विराट कोहली आहे.
