
अकोला एमआयडीसी परिसरात दोन दिवसांआधी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत उद्ध्वस्त केलेल्या बनावट गुटखा कारखान्याप्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला एमआयडीसीच्या ज्या गोदामामध्ये हा बनावट आणि प्रतिबंधित गुटखा तयार केला जात होता, ते गोदाम अभिषेक गई याच्या मालकीचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अभिषेक गई हा भाजप नगरसेवक विनोद मापारी यांचा भाचा आहे.
