दैनिक आवाज महाराष्ट्राचा
-
राजुरी येथे रस्त्यालगतच्या विहिरीत क्रेटा कार कोसळली; चालक सुखरूप बचावला
करमाळा | प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील राजुरी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये क्रेटा कार अपघातग्रस्त होण्याची घटना घडली. या अपघातात कारमधील चालक विहिरीत अडकला होता.
घटना लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी सतर्कता दाखवत तसेच उत्कृष्ट पद्धतीने प्रयत्न करत चालकाला सुखरूप बाहेर काढले. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे चालकाचा जीव वाचवण्यात यश आले.
या घटनेनंतर परिसरात काही काळ नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अधिक माहिती मिळणे बाकी आहे.
