कर्जत शहरात गणेशमूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी; बाजारपेठेत उत्साहाचे वातावर
कर्जत: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहरात गणेशमूर्तींच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग वाढली आहे. शहरातील गणेशमूर्ती विक्रीच्या स्टॉलवर विविध आकार व आकर्षक स्वरूपातील गणेशमूर्ती उपलब्ध झाल्या असून, बाप्पाची मूर्ती घरी नेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
गणेशोत्सव जवळ येताच बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतीसाठी मूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारात दाखल होत आहेत. विशेषतः लहान आकाराच्या आकर्षक मूर्तींना नागरिकांकडून पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गणरायाच्या आगमनासाठी शहरातील विविध गणेश मंडळांकडूनही मंडप, सजावट व विद्युत रोषणाईची तयारी सुरू असून, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने करजत शहर गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे.
