
कर्जत : भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व समाजसेवक सुनील यादव यांना जीवे मारण्याची तसेच त्यांच्या कुटुंबीयांना धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी यादव यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रार करून चार दिवस उलटूनही अद्याप अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा दावा यादव यांनी केला आहे. वारंवार धमकीचे फोन येत असून अश्लील व शिवीगाळ करणाऱ्या भाषेत धमकावले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणाची माहिती त्यांनी भाजप आमदार व सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडेही देऊन तातडीने लक्ष घालण्याची विनंती केल्याचे यादव यांनी सांगितले.
दरम्यान, धमक्यांमुळे आपण मानसिक तणावाखाली असल्याचे सांगत “माझ्या जीवाला धोका असून, माझ्याबाबत काही अनुचित घटना घडल्यास त्याला शासन व प्रशासन जबाबदार असेल,” पोलिसांकडे पोलीस प्रोटेक्शन ची मागणी असा गंभीर इशारा सुनील यादव यांनी दिला आहे. तसेच कारवाई न झाल्यास टोकाचे पाऊल उचलण्याचा इशाराही त्यांनी दिल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणातील आरोपांची अधिकृत पुष्टी होणे बाकी असून, पोलिस तपासानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
