# 📰 दैनिक आवाज महाराष्ट्राचा
### **राशीनच्या जगदंबा माता मंदिरात २६ सप्टेंबरला सुपर्जन्य वृष्टीसाठी विशेष चंडी याग**
**राशीन, ता. कर्जत :** श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुवर्य गुरुमाऊली यांच्या कृपाशीर्वादाने व युवा संत आ. दादासाहेब यांच्या आदेशानुसार **आई भगवती श्री जगदंबामाता मंदिर, राशीन** येथे सुपर्जन्य वृष्टीसाठी **श्रीपर्जन्य चंडी याग हवनयुक्त सेवा** आयोजित करण्यात आली आहे.
**शनिवार, दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता** या विशेष सेवेचा प्रारंभ होणार आहे. पाणी व पावसाचे महत्त्व लक्षात घेता सर्व केंद्रांतील सेवेकरी तसेच भाविकांनी या सेवेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, नगर, शेवगाव, पाथर्डी, करमाळा, अहिल्यानगर तसेच पुणे जिल्ह्यातील इच्छुक सेवेकऱ्यांनी आपल्या केंद्रातून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आयोजकांनी सांगितले.
### **📍 कार्यक्रमाचे ठिकाण**
**श्री जगदंबा माता मंदिर, राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर**
सेवेसाठी **श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ (मराठी), श्री नित्यसेवा ग्रंथ, जपमाळ, आसन, पाण्याची बाटली** तसेच आवश्यक **कोरडे हवनद्रव्य** सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
**पर्जन्यवृष्टीसाठी आयोजित या सामूहिक सेवेत भाविकांनी सहभागी व्हावे,** असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.
**📰 दैनिक आवाज महाराष्ट्राचा**
*आपल्या परिसरातील प्रत्येक बातमी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सदैव तत्पर*
